महिला वरील अन्याय दूर करण्यासाठी संघटित व्हा :जयश्री ताई सावंत.
*सांगोला येथे महिला दिन साजरा*
सांगोला प्रतिनिधी
राजमाता अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माता, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्यामुळे महिलांना मानसन्मान मिळाला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे स्वातंत्र्य मिळाले परंतु आज ही महिला घाबरतात. तर न घाबरता, ताठ मानेने सर्व क्षेत्रात काम करा, संघटना आपल्या पाठीशी राहील परंतु यासाठी सर्व महिलांनी एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे आहे असे मत पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्षा जयश्रीताई सावंत यांनी सांगोला येथे महिला दिनानिमित्त महिला मेळाव्यात मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र जनसंपर्कप्रमुख विजयाताई कर्णवर या होत्या.
सुरुवातीस महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. तर भारतीय संविधान म्हणजे श्वास आहे, घास आहे व महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे साधन आहे व यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचणे गरजेचे आहे व कायदेविषयक माहिती तसेच अंधश्रद्धा, मुलगा, मुलगी भेदभाव न करता महिलांनी बालविवाह पासून दूर राहणे गरजेचे आहे. तसेच देशाचा, कुटुंबाचा व स्वतःचा विकास करावा असे मत प्रा. तानाजी सूर्य गंध यांनी महिला मेळाव्यात व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयाताई कर्णवर यांनी महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संघटना कार्यरत आहे हाक द्या, साथ देऊ असे सांगितले. तर मुलगा, मुलगी भेदभाव न करता, बालविवाहापासून महिलांनी दूर राहावे असे मत सुनीता गडहिरे यांनी व्यक्त केले.
यावेळी मानव अधिकार संघटने कडून सौ उज्वला बोराटे, संध्या काटे यांना आयडी देण्यात आल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी पोलीस मित्र संघटना विधानसभा अध्यक्ष अरुण वाघमोडे, सांगोला तालुका अध्यक्ष शिवाजी इंगोले, मानव अधिकार संघटनेचे गोविंद कोरे, सांगोला तालुका वर्तपत्र संघटना अध्यक्ष रविराज शेटे, निरीक्षक सौ शोभा बगाडे, सत्कारमूर्ती दिपाली माने, बायडाबाई लवटे, आरती माने, जयश्री कसबे, विमलताई खटकाळे, रंजनाताई कांबळे, सुरेखा जाधव, संध्या काटे तसेच पोलीस उपनिरीक्षक मनीषा केंगार, अर्चना रुपनर, अंजना खांडेकर, सौ. सिंधू कांबळे, माने साहेब, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी इंगोले यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा