भाजप पंचायत राज व ग्रामविकास सांगोला तालुका अध्यक्ष विकास वलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.
वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका उदनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपचे पंचायत राज व ग्राम विकास सांगोला तालुका अध्यक्ष विकास वलेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.३० फेब्रुवारी रोजी विविध त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, सकाळी नऊ वाजता सरूआई मठ या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच ॲ. सचिन देशमुख मित्र परिवार व श्री.टेके आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भव्य मोफत डोळे तपासणीचे शिबिर आयोजित केले आहे तरी या मोफत नेत्र तपासणीचा विकास वलेकर सर व त्यांच्या मित्रपरिवार तर्फे नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लेख.
उदनवाडी येथील जनसेवेचा वसा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते विकास दत्तात्रेय वलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त
उदनवाडी तालुका सांगोला, उदनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांचा आज 1 मार्च 2023 वाढदिवस. विकास वलेकर सर यांनी गेल्या अनेक वर्षापासून जनसेवेचा वसा घेतला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गोरगरिबापर्यंत पोचवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम विकास ओलेकर सर यांनी गेल्या अनेक वर्षापासून केले आहे. जनसेवेसाठी त्यांनी उदनवाडी गावामध्ये कार्यालय खोलले आहे. वेळोवेळी विविध योजनांचे कॅम्प लावणे, दिव्यांगांना सहकार्य करणे, निराधार, विधवा, गोरगरीब यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे काम गेल्या अनेक वर्षापासून ते आनंदाने करत आहेत. जनसामान्यांनाही आपलासा वाटणारा असा त्यांचा स्वभाव आहे. फक्त उदनवाडीतीलच नाही तर सांगोला तालुक्यातील सर्व गोरगरिबांना त्यांचे सहकार्य असते. येणाऱ्या काळामध्ये सांगोला तालुक्यातील सर्व गावांमध्ये पोहोचून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्या कुटुंबाने.शासनाचा योजनेचा लाभ घेतला आहे की नाही ते पाहून प्रत्येक गावामध्ये कॅम्प लावून त्या मार्फत शासकीय योजनांचा लाभ देण्याचा मानस त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. दिव्यांगासाठी सोलापूर व पंढरपूर येथून प्रमाणपत्र काढणे, दिव्यांग पेन्शन करणे, यामुळे दिव्यांग नाही आपलासा वाटणारा असे शांत, संयमी, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, सर्वांना सहकार्य करणारा, असा हा आपला माणूस आहे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वांच्याच वतीने खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या आशीर्वादाने मा.विकास वलेकर सर यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचं व्यक्तिमत्व असंच हसतमुखी, आनंदी राहो त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडत राहो हेच परमेश्वरास प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा