जिल्हा क्रिडा स्पर्धेत सांगोल्याचे घवघवीत यश
जिल्हा क्रिडा स्पर्धेत सांगोल्याचे घवघवीत यश
{महिला व पुरुष दोन्ही कबड्डी संघ विजयी }
सोलापूर:-जिल्हा परिषद सोलापूर आयोजित कर्मचारी व पदाधिकारी क्रिडा स्पर्धेत सांगोला पंचायत समिती अंतर्गत कर्मचारी यांनी कबड्डी महिला व पुरुष दोन्ही स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जिद्दीने खेळ करत सांगोला महिला व पुरुष कबड्डी संघाने सांघिक जोरावर मोहोळ महिला व पुरुष कबड्डी संघाचा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
यावेळी महिला संघातील मनिषा लवटे यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी बेस्ट प्लेयर ऑफ कबड्डीची ट्राॅफी देवून गौरविण्यात आले. तसेच
पुरुष टीमचा कर्णधार राजकुमार ताटे यांना बेस्ट प्लेयर ऑफ कबड्डीची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी कबड्डी पुरुष संघात राजकुमार ताटे यांच्या सोबत बापूसो मिसाळ, दादासो ढेंबरे, समाधान आदाटे, गजानंन दांडेगावकर, शिरीष ऐवळे ,रामप्रभू वाघ या शिक्षण विभागातील खेळाडूंनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करुन संघाचा विजय साकारला
तसेच महिला संघात मनीषा लवटे यांच्यासोबत भारती पाटील, नागर होवाळ ,कल्पना डोंगरे, उल्का राजकर ,अश्विनी माने ,माया गोसावी, सुनीता माळी, संगीता वाघमारे ,सुलताना शेख, रोकडे या सर्व महीला खेळाडूंची विजयी संघात महत्वाची भूमिका राहिली.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले , गटविकास अधिकारी लोकरे ,आयसीडीएस सुपरवायजर जांबेनाळ मॅडम सीडीपीओ गारुळे साहेब, अत्तार मॅडम, व गडहिरे मॅडम यांनी अभिनंदन केले.





No comments