सांगोला (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत गाडगेबाबा जयंती, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी, महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजीराजे जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती या निमित्त सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ ते शुक्रवार दि. ३१ मे २०२४ पर्यंत सांगोला शहरातील खंडागळे हॉस्पिटल येथे अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे यांनी दिली.
यामध्ये कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया, नॉर्मल डिलेव्हरी, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, सिझेरियन, गर्भाशयाची पिशवी काढणे, सुंता, अपेंडीक्स, हर्निया ऑपरेशन, मुळव्याध, फिच्युला व फिशर या शस्त्रक्रिया अंत्यत माफक दरात केल्या जाणार आहेत. तरी सांगोला तालुक्यातील व परिसरातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी खंडागळे हॉस्पिटल येथे भेट देवून अथवा 7741807957, 9689989090 या नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन डॉ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा