माण नदीवरील बंधारे त्वरित भरून द्यावे अन्यथा आंदोलन करणार : डॉक्टर बाबासाहेब देशमुख.
सध्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवु लागली आहे. बहुतांश भागातील शेतातील पिके नष्ट झाली आहेत, अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी आपली पिके कसीबसी जतन केलेली आहेत. अशा पिकांना वाचवण्यासाठी व जनवरांना व नागरीकांना पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने टेंभू सिंचन योजनेद्वारे माण नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे त्वरित भरुन घेण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी ,कराड यांच्याकडे केलेली आहे.
सदर निवदन शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या सहीने देण्यात आले असुन. सदर निवेदनाची दखल घेऊन ताबडतोब पाणी सोडण्यात यावे अन्यथा शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी लोकशाही पध्दतीने आंदोलन करेल असा इशारा डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिलेला आहे..सदर निवेदन देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई बाळासाहेब एरंडे ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव,युवा नेते उल्हास धायगुडे पाटील उपस्थित होते सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन टेंभू सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रेड्डीआर यांनी दिल्याची माहिती प्रसिद्ध चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
"दुष्काळाच्या तोंडावर पाणीटंचाई झाली असल्याने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाने बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी करून एक प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने निवेदन दिले असून यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात दुष्काळावरती मात करण्यासाठी व पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी कामगार पक्षाने कंबर कसली असल्याचे बोलले जात आहे शेतकरी कामगार पक्षाच्या या मागणीचे तालुक्यातील शेतकऱ्याकडून स्वागत केले जात आहे "

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा