Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना देव मामलेदार यशवंतराव महाराज पुरस्कार प्रदान*

*शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना देव मामलेदार यशवंतराव महाराज पुरस्कार प्रदान*

सांगोला प्रतिनिधी
           सामान्य नागरिक व सरकार यांच्यामधील दुवा म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशासन व प्रशासनातील कार्य तत्पर अधिकाऱ्यांना ही भूमिका अत्यंत तंतोतंत पार पाडावी लागते याचेच उदाहरण शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी गेल्या काही दिवसात शिक्षण क्षेत्रात नाना विविध महत्त्वपूर्ण बदल घडवले व शिक्षण क्षेत्राला एक नवीन ओळख व नवीन दिशा देण्याचे काम त्यांच्यामार्फत करण्यात आले या कार्याची दखल घेऊनच आयुक्त मांढरे यांना प्रशासकी सेवेतील उल्लेखनीय व कार्यतत्पर कार्यामुळे देवमामलेदार यशवंतराव महाराज पुरस्कार सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते सटाणा (नाशिक) येथे नुकताच प्रदान करण्यात आला. प्रशासनातील कार्यतत्पर पारदर्शक व उल्लेखनीय कार्य केलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
*_________________________*
*देव मामलेदार यशवंतराव महाराज पुरस्कार पार्श्वभूमी*
         *श्री यशवंतराव महाराज यांचे मुळगाव भोसे तालुका पंढरपूर जि सोलापूर हे आहे संताची भूमी म्हणून पंढरपूरचे नावलौकिक आहे व या भूमीस विठ्ठल भूमी म्हणून ही ओळखले जाते श्री यशवंत राव महाराज यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गोरगरीब, निराधार महिला व मुलेे आजारी व व्याधीग्रस्त यांना मदत कारताना आपले सर्व आयुष्य वेचले. त्या सर्वांना ते आपले कुटुंबियाच मानीत असत. इ. स. १८२९ ते १८७२ तब्बल ४३ वर्षे महसूल खात्यात विविध पदावर नोकरी केली. त्यांनी महाराष्ट्राचे विविध भागात नोकरी केली. १८७०-७१ दरम्यान नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळेस तेथे मामलेदार असलेले यशवंतराव भोसेकर यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख २७ हजार रुपये नागरिकांना वाटले,व जेव्हा हे वरील इंग्रज अधिकाऱ्याला कळाले तेव्हा ते खजिन्याची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा तो सर्व खजिना तसाच तिजोरीमध्ये त्यांना दिसला. हा चमत्कार खूप मोठा होता. असे बरेच चमत्कार त्यांनी बागलाणकरानां दाखवले. तेव्हा पासून लोकांनी त्यांना देव मानले. त्यांच्या सत्प्रवृत्तीमुळे व कार्यामुळे लोक त्यांना देव मामलेदार वा यशवंतराव महाराज अशा नावाने ओळखू लागले. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रशासनातील जे अधिकारी कार्य तत्परता व उल्लेखनीय कार्य करतात या अधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.*
*__________________________*
           या पुरस्कारामुळे कार्य करण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा मिळाली तसेच एक अधिकारी म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवकच आहे व यापुढेही अधिक जोमाने व तत्परतेने काम करू असे सत्कार प्रसंगी सत्कारमूर्तीं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी यावेळी मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart