नाझरे प्रतिनिधी
सध्या स्पर्धेच्या युगात व बदलत्या काळात लोप पावत चाललेली धनगरी ओवी अनकढाळ ता. सांगोला या छोट्याशा गावातील मंडळींनी कला उत्तम प्रकारे जोपासली असून त्यांचे हे कार्य अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. घर प्रपंच सावरत त्यांनी ही कला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु या कलाकारांना शासकीय मानधन अगर पेन्शन पासून वंचित घटक राहिला आहे तरी महाराष्ट्र शासनाने त्यांची दखल घेऊन मानधन सुरू करावे अशी ओविकार मंडळींची मागणी आहे.
बिरुदेव ओविकार मंडळ अनकढाळ ता. सांगोला गेल्या सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून अनकढाळ व परिसरात तसेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात ओवीच्या माध्यमातून आपली कला जोपासत असून, या कामी समाधान गडदे, रामचंद्र सरगर, दगडू होनमाने, शहाजी धायगुडे , बचाराम होनमाने, रावसाहेब बंडगर, दगडू होनमाने, दादासो बंडगर ही मंडळी कार्यरत असून, सण, उत्सव, कोरोना जनजागृती, लेक वाचवा, एड्स जनजागृती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना देऊन जनजागृती करीत आहेत. त्यांचे हे जीवन कलेवर अवलंबून असल्याने त्यांना मानधन आगर शासकीय योजना चा लाभ मिळत नाही तरी या वंचित घटकांना न्याय देऊन मानधन देणे गरजेचे आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा