वाटंबरे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात.
सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी 26 जानेवारी रोजी ७५ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आंनदात साजरा करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गावात बँडच्या तालावर घोषणा देत प्रभात फेरी मारली .या वेळी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा सोसायटी व प्रशालेत ध्वजारोहण केले . श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल या प्रशालेचे ध्वजारोहण प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मोहन पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले , जिल्हा परिषद केंद्र शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत कार्यालय सरपंच किरण पवार, तलाठी कार्यालय येथील ध्वजारोहण उपसरपंच मोनिका निकम, विकास सेवा सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन नाना बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी सोसायटी चेअरमन गणपत पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी ग्रामपंचायत सदस्य बबनदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रजासत्ताक दिनासाठी शालेय विद्यार्थी ,शिक्षक कर्मचारी वर्ग तसेच वाटंबरे गावातील मान्यवर , नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा