Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

हडपसर पाटबंधारे शाखा कार्यालय येथे 26 जानेवारी दिनानिमित्त सुरक्षारक्षक कांता राठोड यांना उत्कृष्ट कामगिरी बाबत शिफारस पत्र देण्यात आले.

हडपसर पाटबंधारे शाखा कार्यालय येथे 26 जानेवारी दिनानिमित्त सुरक्षारक्षक कांता राठोड यांना उत्कृष्ट कामगिरी बाबत शिफारस पत्र देण्यात आले.

शुक्रवारी .दि 26 जानेवारी रोजी पुणे येथे हडपसर पाटबंधारे शाखा कार्यालयातील ध्वजारोहण शाखाधिकारी विरेष राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटबंधारे ची सुरक्षा व अतिक्रमण सांभाळत असलेले पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक कांता मानू राठोड व गणेश एकनाथ गार्डे या दोन सुरक्षारक्षकांचा शिफारस पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती उपविभागीय अभियंता मोहन बदाणे सर, शाखाधिकारी विरेष राऊत सर, स्थापत्य अभियांत्रिकी सविता येळमेळी पाटील मॅडम, सोनाली गायकवाड मॅडम, सुप्रिया जगताप मॅडम, अस्मिता ठोंबरे मॅडम, सुनील जगताप सर व सर्व सुरक्षा रक्षक हजर होते.
यावेळी शाखाधिकारी विरेष राऊत सर यांनी सर्व सुरक्षा रक्षकांना आपली ड्युटी ,कर्तव्य, जबाबदारी चांगल्या व प्रामाणिकपणाने पार पाडा त्याबद्दल आपल्या सुरक्षारक्षक कातील दोन सुरक्षारक्षकाला उत्कृष्ट कामगिरी बाबत शिफारस पत्र देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे बाकीच्या सुरक्षारक्षकांनी आपली नेहमीची ड्युटी प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठ राहून पार पाडावे त्यांना सुद्धा यापुढे शिफारस पत्र देण्यात येईल व त्याची पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ शासन स्तरावर तुमचा योग्य सत्कार व प्रशस्तीपत्र देईल त्यामुळे सर्व सुरक्षा रक्षकाने आपली ड्युटी प्रामाणिकपणे व्यवस्थित पार पाडावी व पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे नावलौकिक करावे.

No comments