Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

ध्येय सातत्य ठेवून कष्ट केल्यास यश प्राप्ती-डॉ सौ वर्षाताई रणदिवे*

 *ध्येय सातत्य ठेवून कष्ट केल्यास यश प्राप्ती-डॉ सौ वर्षाताई रणदिवे*


नाझरे प्रतिनिधी


महिलांनी आपण कोणतेही काम करताना डोळ्यांसमोर ध्येय ठेवून कष्ट केल्यास हमखास यश प्राप्ती होणार असे मत भावेश्वरी मिरची कांडप मशीन उद्घाटन प्रसंगी नाझरे ता सांगोला येथे जाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ सौ वर्षाताई मारुती रणदिवे यांनी व्यक्त केले कांडप मशीन चे उद्घाटन मुंबई विक्रीकर उपायुक्त मारुती रणदिवे व डॉ सौ वर्षाताई रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी पत्रकार रविराज शेटे होते

        महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत परंतु ग्रामीण महिला व्यवसाय व उद्योग करताना मी कसा करू मला होईल का तर असे न करता धाडसाने करा परंतु सातत्य ठेवा मग तू कोणताही उद्योग असो कारण मिरची कांडप मशीन आज गरजेची आहे यासाठी दुकान उघडे ठेवा हेलिकॉप्टर पायलट दीपिका मिश्रा यांनी मध्य प्रदेश मधील पूर मदत मोहिमेत परत दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचा नुकताच शौर्य पुरस्कार आणि सन्मान करण्यात आला त्यामुळे उद्योग व्यवसाय करताना धाडस करा हमखास यश प्राप्ती होणार असेही यावेळी डॉ सौ वर्षाताई रणदिवेयांनी सांगितले

      सदर प्रसंगी आनंदा सोनार कविता सोनार अन्नपूर्णा सोनार सुमन सोनार संजय सोनार बस लिंग मठपती स्वामी जाई फाउंडेशन अधिकारी सौ दिपाली स्वामी सौ शुभांगी धोकटे सौ अर्चना रायचूरे भारती लोहार सौ प्रियांका निंबाळकर कल्पना सोनार सखुबाई शेजाळ समाधान वाघमारे संजय वाघमारे संतोष रायचुरे सचिन धोकटे गोपाळ चांडोले लक्ष्मण सोनार शिवया गुत्तेदार नाना सरगर संजय वलेकर निलेश सरगर उपस्थित होते शेवटी संजय सोनार यांनी आभार मानले

No comments