Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सद्गुरूंची संगत गरजेची आहे -वाईकर महास्वामीजी*

 *भगवान शिवाची आराधना करा - कोळेकर महास्वामीजी*




*सद्गुरूंची संगत गरजेची आहे -वाईकर महास्वामीजी*

नाझरे प्रतिनिधी

          माता लक्ष्मी व विष्णूंनी भगवान शिवाची आराधना करून एक लक्ष बेल कमळ शिवास वाहिले परंतु यामध्ये एक कमी पडले,शंकर-पार्वतीच्या दिव्य तुलेची पौराणीक सुंदर कथा सांगितली व प्रत्येकाने अहंकार गर्व नष्ट करण्यासाठी गुरु तुला स्वकष्टाने व स्वतः निर्माण केलेली वस्तू अर्पण करणे गरजेचे आहे व सर्व शिवभक्तांना धनसंपत्ती व जीवनात आनंद मिळण्यासाठी शिवाची आराधना गरजेचे आहे असे गुरुनिर्वाणु रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी भव्य दिव्य गुरू तुला कार्यक्रमात महादेव मंदिर अकलूज येथे आशीर्वाचनात सांगितले.


       सुरवातीला प्रास्ताविक करताना शिवनिर्णय संघटनेचा कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना उपासनेला दृढ चालवावे भुदेव संतासी सदा नमावे... सत्कर्म योगे वय घालवावे ही प्रार्थना म्हणत गुरुमहती सांगीतली तसेच स्मशानभूमी स्वच्छता,वधुवर मेळावा,जिद्द पुरस्कार,कार्यकर्तृत्व पुरस्कार,गरजूंना मोफत कपडे वाटप,आई-वडील कृतज्ञता सोहळा यासारखे विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम सर्वांच्या सहकार्यातून आजवर आयोजित केल्याचा आढावा प्रास्ताविकात उत्कर्ष शेटे यांनी विशद केले. 


 गुणवंतांचा सत्कारामध्ये समृद्धी गुळवे,ऐश्वर्या गुळवे,श्रेयस उबाळे,ज्ञानेश्वर गाढवे,राजलक्ष्मी शेटे,अथर्व गुळवे,सुनील दळवी,विस्ताराधिकारी सावळजकर,पत्रकार रविराज शेटे सर या गुणवंतांचा सत्कार दोन्ही महास्वामींच्या हस्ते करण्यात आला.


अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरु करतात व त्यांचे महत्त्व फार मोठे आहे व जीवनाचा खरा मार्ग दाखविणारा गुरुच असतो त्यामुळे गुरु विषयी श्रद्धा ठेवा व वीरशैव तत्व व संस्कार-संस्कृतीचे महत्व अनन्यसाधारण आहे,असे सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहासाचे अभ्यासक प्रशांत सरूडकर यांनी मनोगतात व्यक्त केले.


       मानवी जीवनात गुरुची संगत गरजेची आहे कारण गुरु अज्ञान नाहीसे करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात व आई वडील यांचे जीवनात फार मोठे महत्त्व आहे त्यांची सेवा करा व आई वडील गेले तर जीवनाचा सार संपला याबद्दल आई विषयी सुंदर गीत गायले.

       चुकलं तुझं बाळ आई रडत धाई धाई गं, येना माझे आई ग तू येना माझे आई ग, या गीतावरून उपस्थित महिला व पुरुष वर्गाचे डोळे पाणावले तसेच आज एक नव्हे दोन दोन शिवाचार्य श्रावण मासात आणून त्यांची भस्म व गुळाने दिव्य तुला करण्याचा सहयोग उत्कर्ष शेटे व सर्व अकलूज वीरशैव बांधवांनी आणला व सर्व शिवभक्तांना जीवनात आनंद प्राप्त होवो व सद्गुरु एक नव्हे तर तीन सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हास प्राप्त झाला असे शिवाचार्य वाईकर महास्वामीजी यांनी आशीर्वाचनात सांगितले

 ******


*यावेळी दोन्ही शिवाचार्य यांच्या दिव्य गुरू तुलेस मा.श्री.शिवतेजसिंह मोहिते-पाटील (माजी सरपंच,ग्रामपंचायत अकलूज) यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम विभूती व गुळ अर्पण करून करण्यात आली* *__________________________*

*सदर प्रसंगी कोळेकर महास्वामीजी पाद्यपूजा शिवभक्त श्री.संजय धोतरे व सौ. सुजाता धोतरे-शेटे या उभयतांच्या शुभहस्ते तर वाईकर महास्वामी ची शिवभक्त श्री.स्वप्नील कोरे व सौ.भाग्यश्री कोरे या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आली*

*_________________________*


       यावेळी शिवभक्त चंद्रकांतनाना कुंभार,किसन नरुळे,उमेश शेटे,भिंगे गुरुजी,दत्तात्रय भिंगे,नितीन आर्वे,राजू आर्वे,चंद्रकांत शेटे,आप्पा दिवटे गुरुजी,रामचंद्र चिंचकर,सुनील दळवी,चंद्रकांत नरुळे,अतुल शेटे विलास क्षीरसागर,संतोष देवशेटे,गिरीश शेटे,उमेश नडगिरे,अशोक शेटे,गणेश नरुळे,उमेश गुळवे,सुनील कोरे,आकाश लकडे,जगदीश स्वामी सौ.शिला जठार,सौ,राजश्री गुळवे,सौ.श्वेता गुळवे,महादेव पाटील,सुहास उरवणे रामलिंग हांडे-सोनके,राजेंद्र शेंडे तसेच पदाधिकारी व वीरशैव लिंगायत बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुहास उरवणे सर तर सर्वांचे आभार शिवभक्त मंगेश नाना शेटे यांनी मानले.

No comments