Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वर्गीय आ.गणपतरावजी देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर.

 *दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वर्गीय आ.गणपतरावजी देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर.



*सांगोला शहरातील जयभवानी चौक येथील दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला ,आटपाडी, मंगळवेढा,जत,पंढरपूर या तालुक्यातील गोर गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत मूत्ररोग निदान उपचार शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे.


 मंगळवार दिनांक १ ऑगस्ट ते गुरुवार दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिरज-सांगली मधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ. चेतन शहा यांच्या सहकार्याने मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर  आयोजित केले गेले आहे. सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार इ. आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी सर्व रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे .ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे अश्या रुग्णांवरती होणारी शस्त्रक्रिया  केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना  महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्या मार्फत मोफत करण्यात येणार आहेत.मोफत मूत्ररोग उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर-गरीब गरजु रुग्णांनी लाभ  घेण्याचे आवाहन दक्षता हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे. सांगोला,मंगळवेढा, आटपाडी, जत,पंढरपूर तालुक्यातील गोर-गरीब गरजू रुग्णांनी  खालील फोन नंबर वरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा.डॉ.अण्णासो लवटे 8484069005 , डॉ. निरंजन केदार 9145124579*


No comments