दिलदार मनाचा राजा माणूस *** आनंदा भाऊ माने
दिलदार मनाचा राजा माणूस *** आनंदा भाऊ माने
सांगोला शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबात आनंदा माने यांचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली .परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना त्यांनी आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करत इतरांना मदतीचा हात देत माणसं व माणुसकी यांना जीवनात अग्रस्थान दिले. पुढे त्यांनी राणीताई माने यांच्याशी विवाह करून कौटुंबिक जीवनाची वाटचाल सुरू केली. सन 2016साली त्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीची स्थापना करून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये नऊ उमेदवारांना विजयी करून नगरसेवक बनवले . पत्नी राणीताई माने यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष करण्यात महायुतीचे नेते व स्वतः कठोर परिश्रम करीत विजय संपादन केला.आनंदा माने यांनी आपल्या जीवनाची वाटचाल करीत असताना माणसं व माणुसकी जपली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्यांनी जनसामान्याला दिलेल्या शब्द पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे राजकीय ,सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख व क्रेझ निर्माण केली आहे. राजमाजा प्रतिष्ठान सामाजिक संस्था स्थापन करून अनेक सामाजिक व विकासात्मक कामे केली. उन्हाळ्यामध्ये पाणपोई सुरू करणे, निसर्गाचा समतोल राखला जावा , निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी त्यांनी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. सांगोला शहरात व परिसरात वृक्ष बहरले आहेत. या वृक्षाच्या छायेखाली उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण विसावतो आहे. राजमाता क्रिकेट अकॅडमी सुरू करून क्रिकेट खेळाडूंना प्रेरणा ,चालना देण्याचे काम केले. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांनी माणुसकीची भिंत हा उपक्रम सांगोला शहरात राबवला. नगरपालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर त्यांना शहराच्या विकासामध्ये मोठी भर टाकायची होती. परंतु काही अडचणीमुळे करता आले नाही. पत्नी राणीताई माने यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले त्यास नगरसेवक आनंदा माने यांनी खंबीरपणे साथ देत आपल्या कार्याचे वेगळेपण दाखवले आहे. युवकांमध्ये त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. सांगोला शहरातील प्रभाग एक मधून त्यांनी नगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करीत आपल्या प्रभागात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावली . हळूहळू पुढे आनंदा माने हे जनसामान्यांचे नेते म्हणून लोकप्रिय ठरले. म्हणून त्यांच्याविषयी मानावेसे वाटते दिलदार मनाचा राजा माणूस आनंदाभाऊ माने. तीन ऑगस्ट हा आनंदाभाऊ माने यांचा वाढदिवस. सन 2015 सालापासून आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विशेष सामाजिक उपक्रम राबविला आहे. समाजातील स्त्री-पुरुष भेदभाव दूर व्हावा. समाजात मुलगा मुलगी भेदभाव होऊ नये .मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी तीन ऑगस्ट आपल्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसा दिवशी सांगोला शहर व तालुक्यात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे ठेव ठेवण्याचा संकल्प केला असून तो आजही सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांना कार्यक्रमासाठी व सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत देऊन त्यांना आपलेसे केले. त्यांच्या या कार्यामुळे गणेश मंडळातील युवक नेहमी त्यांच्या सोबत असतात. आनंदा माने यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपले वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवित यशस्वी पणे साजरे केले आहेत. गुरुवार तीन ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा .परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो व त्यांचे जीवन सुखमय होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पत्रकार--- दशरथ बाबर ,चोपडी




No comments