Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १५ जुलै, २०२३

केदार हॉस्पिटल येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर पंधरवडा*

 केदार हॉस्पिटल येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर पंधरवडा*



 डॉक्टरकीचा व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी जोपासत विविध शिबिराच्या माध्यमातून रुग्णांचे सेवा करणारे   डॉ. निरंजन केदार यांच्या सांगोला येथील वासुद रोड दत्तनगर जवळ असणाऱ्या केदार हॉस्पिटल येथे  मोफत मूत्ररोग निदान उपचार शस्त्रक्रिया शिबीर पंधरवडा याचे आयोजन केले आहे. शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर  २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिरज-सांगली मधील सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉ. चेतन शहा यांच्या सहकार्याने मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीर  आयोजित केले गेले आहे. सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार इ. आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबिरासाठी जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन  यावे व मोफत उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.अण्णासो लवटे व फिजिशियन डॉ. निरंजन केदार यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना मूत्ररोग संबंधातील शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना  महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यांच्या माध्यमातून मूत्ररोग तज्ञ डॉ.चेतन शहा यांच्या  आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगली यांच्या  सहकार्यातून करण्यात येणार आहे .सांगोला,मंगळवेढा, आटपाडी, जत,पंढरपूर तालुक्यातील गोर-गरीब गरजू रुग्णांनी  खालील फोनवरती संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा. 8484069005 , 9145124579*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart