Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

कोळे ते शिखर शिंगणापूर दिंडी सोहळ्याचे आयोजन

 *कोळे ते शिखर शिंगणापूर दिंडी सोहळ्याचे आयोजन*



नाझरे प्रतिनिधी

             कोळे ता सांगोला ते शिखर शिंगणापूर पायी दिंडी सोहळा मंगळवार 28 मार्च रोजी कोळे येथून सकाळी आठ वाजता निघणार असून दिंडी बरोबर श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी ,तसेच अधिकारी रुद्र पशुपती कोळेकर महाराज, व श्री श्री 108 मासोळीकर महाराज, व श्री महादेव महाराज हिंगणगाव पायी चालत निघणार आहेत, व गुरु सहवासाचा व शिव चिंतनाचा लाभ होणार आहे व यासाठी कोळे मठात सत्तावीस मार्च रोजी मुक्कामी भक्तांनी हजर रहावे असे आवाहन दिंडी प्रमुख मंडळ व वीरशैव समाज कोळे यांनी केले आहे.

         सदर दिंडीमध्ये महादेव महाराज, रेखाताई शिंदे ,सोमेश्वर देवस्थान हातीद ,वीरभद्र देवस्थान नाझरे, रुद्र पशुपती भक्त मंडळ केमवाडी ,या दिंड्या व असंख्य शिष्यवर्ग सामील होणार आहेत.

        दिंडी कार्यक्रमात महा स्वामींचे प्रवचन ,शिवकीर्तन, शिव पाठ व गुरुचे आशीर्वचन ,तसेच जयश्री शीलवंत ,दयानंद नागापल्ली यांचे कीर्तन व 31 मे ते दोन एप्रिल या तारखेस शिंगणापूर येथे परम रहस्य ग्रंथाचे पारायण व श्री श्री 108 रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचे प्रसादाचे कीर्तन होईल. तरी शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन महादेव चिवटे अण्णा यांनी केले आहे.





No comments