Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

लाईनमन व वायरमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली - उपकार्यकारी अभियंता आनंद पवार

 *लाईनमन व वायरमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली -   उपकार्यकारी अभियंता आनंद पवार*

  नाझरे प्रतिनिधी




                   ऊन,वारा व पाऊस याची तमा न बाळगता आमचे कर्मचारी अहोरात्र वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपड करतात परंतु सर्व वायरमन व लाईनमन यांनी एकत्र येऊन मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे वृद्धासाठी फळे व पाण्याचा फिल्टर भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासली असे मत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी याप्रसंगी मत व्यक्त केले

 *________________________*                

 *सांगोला शहरात लाईनमन दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्वांनी एकत्र येऊन वृद्धाश्रमास पाण्याचा फिल्टर भेट देऊन उन्हाळ्यात गारवा निर्माण केला असाच गारवा वायरमन व लाईनमन यांच्या जीवनात येईल व एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करून वृद्धांना सेवा उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे मत सहाय्यक अभियंता अमित शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.*

*__________________________*

                 सदर प्रसंगी सहाय्यक अभियंता गजानन राऊत,लाईनमन गणेश रणदिवे,हंबीरराव शेळके,सिद्धेश्वर बनसोडे,लखन आगलावे,पंकज मोरे तसेच बाह्य स्रोत व शिकाऊ उमेदवार उपस्थित होते.




No comments