Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

समर्थ प्रशिक्षण केंद्रात सोनिया कांबळे व संगीता चव्हाण प्रथम

 समर्थ प्रशिक्षण  केंद्रात सोनिया कांबळे व संगीता चव्हाण प्रथम




             सोनिया कांबळे


(समर्थ  प्रशिक्षण केंद्र मंगळवेढा  चा शंभरटक्के निकाल)


जत:महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाइन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था संचालित समर्थ शिक्षण व प्रशिक्षण केंद्र मंगळवेढा या केंद्रात डिसेंबर 2022 मध्ये घेतलेल्या मोंटेसरी सुपरवायझर व मोंटेसरी शिक्षिका या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समर्थ प्रशिक्षण विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये मोंटेसरी सुपरवायझर या परीक्षेत सोनिया मधुकर कांबळे यांचा 87.05.% गुण मिळवून व मोंटेसरी शिक्षिका परीक्षेत मध्ये संगीता नामदेव चव्हाण यांचा 81.25%विशेष योग्यता श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

              संगिता चव्हाण 

          समर्थ प्रशिक्षण केंद्रात अंगणवाडी शिक्षिका ,सुपरवायझर, अंगणवाडी मदतनीस, पत्रकारिता, ब्युटी पार्लर,फॅशन डिझायनिंग, शिवणकाम या विषयाच्या अध्यापनाचे कार्य होत असते. प्रशिक्षण केंद्राची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली आहे. यामध्ये योग्य मार्गदर्शन व प्राध्यापकाचे अध्यापन कौशल्य याचाही मोठा सहभाग आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे, प्राचार्य प्रशांत मिसाळ,सहशिक्षिका अमृता कोळी,सोमेश्वरी फंड संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,सचिव प्रमिला साळुंखे,खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह पालकांनी यशाबद्दल अभिनंदन केले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart