वाटंबरे ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
वाटंबरे ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
सांगोला तालुका वाटंबरे ग्रामपंचायत कार्यालयात दि. ३ जानेवारी २०२३ मंगळवारी भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच किरण पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्रथम पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भानुदास माळी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या जयंतीस वाटंबरे ग्रामपंचायत सरपंच किरण पवार, माजी सरपंच प्रविण पवार, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पवार, ग्रामपंचायत सदस्य हसन मुलानी, शिंदे तलाठी भाऊसाहेब, तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुब्राव बापू पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय पवार, आरोग्य सेवक डॉक्टर मुल्ला, नारायण पवार,गुणवंत साळुंखे, अविनाश पाटोळे, बबन पवार , बाजीराव पवार, बाळासाहेब पवार ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.



No comments