आ.शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार.
आ.शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार.
सांगोला तालुका वाटंबरे गावचे रहिवासी शरद पवार हे सध्या सातारा जिल्हा वाई तालुका या ठिकाणी उद्योगधंद्याच्या निमित्ताने कार्यरत आहेत. त्यांची त्या ठिकाणची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कामगिरी पाहून बाळासाहेबांची शिवसेना वाई तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
आज ते त्यांच्या मूळ गावी वाटंबरे येथे आले असता त्यांचा सांगोल्यात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी युवा तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बापूंनी त्यांच्या सत्कार करत त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




No comments