Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळे पाणावले.

निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळे पाणावले. 


{वाटंबरे केंद्रशाळेत चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न }

वाटंबरे /प्रतिनिधी:   या शाळेतील शिक्षकांनी शिस्त लावून विद्यार्थी म्हणून आमचा सर्वांगीण विकास घडवला.एक माणूस म्हणून कसे जगावे याचे धडे दिले. आम्ही भविष्यात नक्की एक उत्तम नागरिक बनू, आपापल्या क्षेत्रात यशस्वी होवू.पण आज ही शाळा सोडताना आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत असे भावोद्गार इयत्ता चौथीच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात आपले मत व्यक्त केले. 

   या वेळी चौथीचे शिक्षक पांडुरंग कोकरे यांनीही या विद्यार्थ्यांविषयी बोलताना सांगितले की, पहिली दोन वर्षे कोरोनामुळे गेली असताना तिसरी आणि चौथीच्या वर्गात या विद्यार्थ्यांना दोन वर्षांत चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे आव्हान होते परंतु विद्यार्थ्यांनी खुप छान प्रतिसाद दिला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक क्षमता उत्तम प्रकारे अंगिकारल्या आहेत.भविष्यात हे विद्यार्थी निश्चितपणे उत्कृष्ट पद्धतीने यशस्वी होतील आपले मनोगत व्यक्त करतान ते पूर्णपणे भावुक झाले होते.
 शाळेतील शिक्षक अरुण मासाळ, मुख्याध्यापिका बनाबाई पवार, राधा तेली ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनीही आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
   यावेळी वाटंबरे गावचे नुतन सरपंच नामदेव पवार यांचा सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
  या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , भाग्यवान पवार उपाध्यक्ष प्रज्ञा चंदनशिवे, दिगंबर साळुंखे,शिक्षणतज्ज्ञ दिग्विजय पवार व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments