मॅक्स इंडिया न्यूजच्या राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने आप्पासाहेब व्हळगळ सन्मानित.
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका राजुरी गावचे सुपुत्र आप्पासाहेब शंकर व्हळगळ यांच्या कृषी ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत मॅक्स इंडिया न्यूज यांच्यावतीने यावर्षीचा राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दि. 2 ऑक्टोंबर रोजी राजुरी येथील महादेव मंदिरात पार पडला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा बंडगर ,प्रकाश दबडे ,जगन्नाथ घोंगडे, तानाजी बंडगर, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब जूजारे, बाळासो बिसले, उपसरपंच महेश काटे ,भारत काटे ,विशाल दबडे ,चरण दबडे ,ज्ञानेश्वर दबडे ,अशोक बंडगर, बजरंग बंडगर ,जावेद पटेल तसेच समस्त राजुरी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा