वाटंबरे येथे रविवारी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन
वाटंबरे (ता. सांगोला) : गावातील सामाजिक व धार्मिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने येत्या रविवारी वाटंबरे येथे सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान खंडोबा मंदिरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात ह. भ. प .मा. प्राध्यापक रामेश्वर महाराज जाधव , प्रमुख वक्ते योगेश शामराव कुलकर्णी, मातृशक्ती श्रीमती अर्पणाताई माणिक साळुंखे या मान्यवरांचे मार्गदर्शन, धार्मिक प्रवचने तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास वाटंबरे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संमेलनात हिंदू संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून युवकांनाही विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू असून, कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गावात प्रथमच हिंदू संमेलनाचे आयोजन असल्यामुळे या संमेलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा