Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था

  

          *मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, पोस्टल व ईव्हीएम साठी स्वतंत्र व्यवस्था*



         उद्या दिनांक 09/02/ 2026 रोजी मतमोजणी   जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून पोस्टल मतदान मतमोजणी 3 टेबलवर स्वतंत्र ठेवलेली असून,  मतमोजणी अगोदर होईल त्यानंतर 20 टेबल ईव्हीएम द्वारे झालेल्या मतांची मतमोजणी होणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी 8:00 वाजता कर्मचारी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मत मोजणी करण्या अगोदर पोस्टल मतमोजणी होईल त्यानंतर 20 टेबल वरती 1)पहिली फेरी  सकाळी 10:00 :वाजता सुरू करण्यात येईल मतमोजणी  पहिले दोन फेऱ्या जिल्हा परिषद महुद गट व गणाची सुरू होईल

 2) तिसरी व चौथी फेरी

 एकतपुर गट व  गणाची होईल 3) त्यानंतर नंतर पाचवी, सहावी  व सातवी फेरी जवळा गट व  गणाची मतमोजणी होईल 4)त्यानंतर  आठवी, नववी व दहावी फेरी कडलास गट व गणाची होईल 5) त्यानंतर  अकरावी व बारावी फेरी चोपडी गट व गणाची होय

6) त्यानंतर  13, 14 व 15 वी फेरी कोळा गट व गणाची होईल 

7)त्यानंतर  16 ,17  व 18 वी फेरी घेरडी गट व गणाची होईल.   

                वरील प्रमाणे मतमोजणी 20 टेबलवर असून एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून एकूण 140 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे तसेच.  

         मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उमेदवाराचे प्रतिनिधी ,माध्यम प्रतिनिधी यांना नियमानुसार प्रवेश  देण्यात येणार आहे संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर काटेकोर लक्ष राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.आर माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart