Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

एसटी बसेस चालकाकडून वाटंबरे येथील प्रवाशांना दाखवण्यात येतो ठेंगा.




 एसटी बसेस चालकाकडून वाटंबरे येथील प्रवाशांना दाखवण्यात येतो ठेंगा.




वाटंबरे /प्रतिनिधी:


सांगोला तालुका वाटंबरे येथील महादेव पवार व वाटंबरे ग्रामस्थ यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्याच्या गाड्या थांबण्यासाठी  प्रयत्न करत आहेत त्यासाठी त्यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार तसेच समक्ष भेटी घेऊन सांगितले  त्यांच्या या मागणीला संबंधित विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत वाटंबरे येथे सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना  अधिकृत थांबा दिला आहे  त्याचा फलक ही त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे परंतु याला  एसटी चालक ठेंगा दाखवण्याचे काम करत आहेत  

वाटंबरे गाव हे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवांशासाठी येण्या जाण्यासाठी सोयीस्कर असे ठिकाण आहे या गावाच्या बाजूला अजनाळे, यलमार मंगेवाडी, चिनके, राजुरी, मानेगाव, निजामपूर, अकोला या गावातील नागरिकांना रत्नागिरी ,नागपूर ,मिरज, कोल्हापूर


,सोलापूर ,पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी हे सोयीस्कर ठीकाण आहे  तसेच या ठिकाणी शाळा, महाविद्यालय ,राष्ट्रीयकृत बँका ,मोठे व्यवसाय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू राहते तसेच बाहेर जाण्यासाठी हे ठिकाण या नागरिकांना सोयीस्कर आहे. परंतु या गोष्टीला एसटी चालकांकडून प्रवाशांना ठेंगा दाखवण्याचे काम करण्यात येत आहे  तरी संबंधित विभागाने अशा एसटी चालकावर कारवाई करण्याची मागणी वाटंबरे येथील प्रवाशांमधून केली जात आहे.






चौकट:

वाटंबरे या ठिकाणी अधिकृत सर्व एसटी बसेस ना थांबा देण्यात आलेला आहे परंतु काही एसटी चालकाकडून  प्रवाशांना ठेंगा दाखवण्याचे काम केले जात आहे तरी  संबंधित विभागाने त्या एसटी चालकावर कारवाई करावी.


          प्रवासी.

No comments