जि. प. प्रा. शाळा आबा नगर येथील मराठी शाळेचे बांधकाम धोकादायक . विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, जबाबदार कोण?
जि. प. प्रा. शाळा आबा नगर येथील मराठी शाळेचे बांधकाम धोकादायक . विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, जबाबदार कोण?
वाटंबरे :प्रतिनिधी
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबा नगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे इमारतीचे बांधकाम सध्या धोकादायक स्थितीत असून रोज विद्यार्थी या इमारतीत जिव मुठीत घेत शिक्षण घेत आहेत.या बांधकामाच्या छताला मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या आहेत, भिंतींचा गिलावा निखळलेला, आडवे भीमचे बांधकाम पडून लोखंडी सळई बाहेर निघालेले आहेत, रोज पडत असणाऱ्या मुसळधार पावसाने सर्व शाळेतुन पाणी पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास जागा नाही अशा या अवस्थेत असलेल्या शाळेत शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. “एखादा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल पालकांतुन उपस्थित केला जात आहे.
शाळेच्या बांधकाम दुरुस्ती व नवीन इमारतीची मागणी शिक्षण विभागाकडे लेखी पत्र द्वारे केली गेली आहे परंतु अजूनही शिक्षण विभागाने ठोस पावले उचलली गेली नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याचे काम शिक्षण विभागातून केले जात आहे असा आरोप पालकांमधून केला जात आहे.
चौकट:
या शाळेतील पालकांनी व ग्रामपंचायत यांनी लोकवर्गणीतून पैसे जमा करून तात्पुरते विद्यार्थ्यांसाठी पत्रा शेड उभा करत त्यामध्ये शाळा भरवण्याचे ठरवले आहे.
चौकट:
एवढी मोठी गंभीर बाब असताना शिक्षण विभागाचा एकही अधिकारी या शाळेकडे फिरकला नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.




No comments