हिंदुस्तान फीड्स , पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय साहित्य व सॅनिटायझर पॅडचे वाटप.
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथे हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत शुक्रवार दि.13 फेब्रुवारी रोजी शालेय साहित्य व मुलींसाठी सॅनिटायझर पॅडचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता पवार यांनी आपल्या मनोगतातून हिंदुस्तान फीड्स व पवार उद्योग समूहाने राबविलेल्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी हिंदुस्तान फीड्स चे निलेश इंगळे यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनीच्या वतीने चालू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून माहिती दिली यावेळी मधुकर पवार, दत्तात्रय पवार यांनी हिंदुस्तान फिड्स व पवार उद्योग समूहाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी पवार उद्योग समूहाचे मोहन पवार, सुभाष पवार ,ज्योतीराम आवताडे ,प्रवीण पवार, महेश इंगळे, नंदकुमार गायकवाड,शिवराज पवार, नवनाथ पवार, पर्यवेक्षक रमेश शिवशरण, खंडागळे सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा