*जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण या स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य मतदान पेटीत बंद 70% टक्के मतदान झाले*
आज दिनांक 07/02/2026 रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे तालुक्यातून 32 क्षेत्रिय अधिकारी सकाळी 6:00 वाजल्यापासून 274 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून आज दिवसभर सतत भेटी देऊन अडचणीचे निराकरण करणे, मॉक पोल अहवाल सादर करणे, सुरुवातीला काही केंद्रावर मॉकपोल पूर्वी बॅलेट युनिट बदलून दिल्याने कोठेही अडचण निर्माण झाल्या नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले
या निवडणुकीत जि प साठी 129 व पंचायत समितीसाठी 178 उमेदवार रिंगणात उभे होते त्यांच्या साठी 1,83,662 इतक्या मतदारांनी मतदान केले
पुरुष मतदार= 94972 स्त्री मतदार = 88414 इतर मतदार=2 एकूण मतदार=1,83,662
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण 70% झाले असून मतदाना ची आकडेवारी घेण्यासाठी नियंत्रण कक्षात 10 टेबल ठेवले होते त्या ठिकाणी संगणक तज्ञ व नियंत्रित अधिकारी बाळासाहेब मोरे प्रभारी नायब तहसीलदार, तसेच पथक प्रमुख सचिन कुंभार सहाय्यक महसूल अधिकारी, आकाश गोडसे, समाधान वाघमोडे सर, अमोल देशमुख सर, अण्णासो सरगर, आर एन टी सुनील बेलभंडारे, सोमनाथ साळुंखे हे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांचे नियंत्रणात कामकाज करीत असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले
सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार व तरुण मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले काही ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले बरेच लोक दूरगांवी व कामानिमित्त नोकरीसाठी बाहेरगावी असल्याने ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर दिसून आले आणि त्यांच्यासाठी प्रशासनाने सुरक्षा पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला तालुका पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तसेच आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप देवकते यांनी वैद्यकीय सुविधा 274 केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, सहाय्यक, सहाय्यिका , आशाताई व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात दिसून आले, ग्रामपंचायत अधिकारी, महसूल अधिकारी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील बी एल ओ क्षेत्रिय अधिकारी आणि *आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उमेशचंद्र कुलकर्णी गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला* या सर्वांनी सकाळपासून खूप कष्ट घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आर. माळी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळूताई भागवत यांनी सांगितले आहे व सर्वांचे प्रशासनाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानले आहे तसेच तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा