सिमासुरक्षाबल दलातील दिग्विजय भगत यांचा वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सन्मान.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे गावचे सुपुत्र व सुरक्षाबल दलात नूतन भरती झालेले दिग्विजय भगत यांचा वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा देऊन त्यांचा व कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.
सीमा सुरक्षा बलदलात भरती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण लातूर येथील चाकुर या ठिकाणी झाले तसेच ते देशसेवा बजावण्यासाठी त्रिपुरा या ठिकाणी जाणार आहेत . गावातील तरुण मुलांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत .
या सन्मान सोहळ्यात ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी दिग्विजय भगत यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दिग्विजय भगत यांनी ग्रामस्थांचे आभार मानत, देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच गावातील तरुण मुलांनी जास्तीत जास्त सुरक्षा दल बलात भरतीसाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा