सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवी यात्रेनिमित्त तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य कृषि महोत्सवाचे २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी आयोजन: तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव
*( सर्व स्पर्धांची नाव नोंदणी २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राहील)
* (शेतकरी महिलांसाठी पाककला स्पर्धा दिनांक - २३ जानेवारी दुपारी २ वाजता)
सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त जिल्हास्तरीय पाककला स्पर्धा व कृषी महोत्सव प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी दिली आहे.
शेतकरी महिलांसाठी पौष्टिक तृणधान्य आधारित पाकस्पर्धा (विजेत्यांना पैठणी सह आकर्षक बक्षीस) आयोजित केली असून २३ जानेवारी रोजी दुपारी २ : ०० वाजता स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. व नाव नोंदणी दिनांक 23जानेवारी रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत. प्रथम ३० सहभागी महिलांना प्राधान्य राहील...!
यात्रेनिमित्त भव्य कृषि प्रदर्शन व मान्यवरांची चर्चासत्रे आयोजित केली आहेत. ए. आय. तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती प्रात्याक्षिके,विविध शासकीय योजनांची माहिती, कृषि प्रदर्शन नमुने स्पर्धा (विजेत्यांना शेतीउपयोगी आकर्षक बक्षिसे दिली जातील), विविध कंपन्यांची कृषि उत्पादने,स्थळ : तालुका कृषि अधिकारी कार्यालय, सांगोला शेजारी मार्केट यार्ड ग्रामदैवत श्री अंबिकादेवी देवस्थान, सांगोला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा