उदनवाडी येथील जि. प. मराठी शाळा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. बाबासाहेब देशमुख , उदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते मा. शशिकांत भाऊ लवटे यांचा वाढदिवस, मा. मच्छिंद्र सुतार यांचा वाढदिवस याचे औचित्य साधून उदनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते मा. विद्येश सुतार यांच्या तर्फे वृक्षारोपण करण्यासाठी जि .प. मराठी शाळा उदनवाडी या प्रशालेस 60 ते 70 वृक्ष देण्यात आले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उदनवाडी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच मा. संदीप भिमराव सरगर व अनकढाळ गावचे माजी सरपंच मा. पिंटूभाऊ बंडगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर जि. प. मराठी शाळा उदनवाडी येथील शिक्षिका सौ. खोबरे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले, त्यानंतर विद्यार्थिनीने आपले विचार व्यक्त केले, तसेच विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर गीत सादर केले, त्यानंतर मान्यवरांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले , या कार्यक्रमासाठी अनकढाळ गावचे मा.सरपंच पिंटू बंडगर,उदनवाडी गावचे सरपंच मा. संदीप सरगर, विदेश सुतार,उदनवाडी गावचे मा.सरपंच मा. फारूक मुलानी, शशिकांत लवटे, मा. सरपंच समर्थ वलेकर, संजय शिंगाडे, सचिन बाबुराव रुपनर,ग्रामपंचायत सदस्य मा. समीर मुलानी, जमीर शेख, प्रशांत वलेकर, सागर वलेकर, धोंडीराम बंडगर,अर्जुन वलेकर, पांढरे मेजर, मच्छिंद्र सुतार, विजय रावसो वलेकर, अंकुश वलेकर, तानाजी सरगर, प्रा. संजय वलेकर, वामन वलेकर, तसेच उदनवाडी गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा. विकास वलेकर यांनी केले व शेवटी सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार जि. प. मराठी शाळा उदनवाडीचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मा. धनंजय धबधबे सर यांनी मानले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Comments System
blogger/disqus/facebook
Disqus Shortname
designcart

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा