Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ५ ऑगस्ट, २०२५

लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय आ.भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन यांचे स्थापना - उद्घाटन समारंभ आणि महाआरोग्य तपासणी, महारक्तदान शिबिराचे ८ ऑगस्ट रोजी आयोजन*

 *लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय आ.भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन यांचे  स्थापना - उद्घाटन समारंभ आणि  महाआरोग्य तपासणी, महारक्तदान शिबिराचे ८ ऑगस्ट रोजी आयोजन*



सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आम.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ३० जुलै पुण्यतिथी व १० ऑगस्ट रोजी जयंती दिनानिमित्त "मोफत महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबिर" शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सांगोला तालुका व पंचक्रोशीतील गोर गरीब गरजू रुग्णांसाठी आयोजित केले आहे. सदरच्या कार्यक्रमांमध्ये सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना सामाजिक बांधिलकी राखून तत्पर व मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय आ.भाई गणपतरावजी देशमुख मेडिकल फाउंडेशन यांचे  स्थापना - उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे . शिबिरामध्ये "रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा"मानून  सोलापूर व सांगली जिल्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स  उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने गरजू रुग्णांची मोफत रक्त तपासणी मोफत औषधे वितरण होणार आहे.तसेच "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान, जीवनदान.." या संकल्पनेखाली महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यासंबंधी तसेच  सर्व शासकीय योजनांची माहिती सांगोला पंचक्रोशीतील लोकांना देण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने प्रत्येक व्यक्तींचे मोफत वैद्यकीय सुविधा व शस्त्रक्रिया यांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड , गोल्डन कार्ड  हे काढून देण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये मोफत कर्करोग तपासणी,बोन डेंसिटी टेस्ट ,डोळ्यांची तपासणी- मोफत चष्मे वाटप, मोफत कार्डिओग्राम - हृदयाची तपासणी तसेच ६० वर्षावरील सर्व लोकांची मोफत अँजिओग्राफी आणि गरज भासल्यास मोफत अँजिओप्लास्टी करणे या विषेश आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.सदरच्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी कॅन्सर , हृदयरोग, मेडिसिन, अस्थिरोग ,स्त्रीरोग,बालरोग,सर्जरी व मूत्ररोग, त्वचारोग, नेत्ररोग ,मणका व मेंदूरोग ,पोटाचे विकार इत्यादी विविध विभागाचे तज्ञ डॉक्टर्स तसेच हृदयरोग तज्ञ आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.निकीताताई देशमुख  सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी उपस्थित राहणार असून सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांनी केले आहे. सदरचे शिबिर हे सर्व रुग्णांच्या सोयीसाठी सांगोला एसटी स्टँड पासून जवळच जुने जे.एच. कलेक्शन( गुगळे कलेक्शन)चा हॉल, अजिंक्य प्लाझा,वासुद चौक, सांगोला येथे शुक्रवार दिनांक ८  ऑगस्ट रोजी सकाळी ९  वाजल्यापासून सायंकाळी ४  वाजेपर्यंत आयोजित केले आहे. तरी सांगोला ,आटपाडी, मंगळवेढा, जत,पंढरपूर इ. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart