Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ७ जून, २०२५

छत्रपतींच्या प्रेरणेने निरोगी व आर्थिक स्वराज्य निर्माण करूया : प्रदीप कुंभार

 छत्रपतींच्या प्रेरणेने निरोगी व आर्थिक स्वराज्य निर्माण करूया : प्रदीप कुंभार



(न्यूट्रीस्टार उद्योग समूहाचा दुसरा वर्धापनदिन संपन्न)


कोल्हापूर :न्यूट्रीस्टार उद्योग समूहाचा शुक्रवार दिनांक 6 जून रोजी शिवाराज्याभिषेक दिनी दुसरा वर्धापनदिन सोहळा कोल्हापूर येथे हॉटेल अत्रिया येथे  उत्साहाच्या व आनंदी वातावरणात संपन्न झाला. यावेळी न्यूट्रीस्टार समूहाचे प्रमुख प्रदीप कुंभार यांनी समर्थ बहुउद्देशी विकास संस्था,न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट प्रा.लिमिटेड व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त,मधुमेह मुक्त व रोगमुक्त भारत अभियान गेली दोन वर्ष यशस्वीरित्या राबविले त्याचा आढावा घेत भविष्यातील वाटचालीचा आलेख मांडला.यावेळी शिवराज्याभिषेक दिनाचा दाखला देत इतिहास बदलला जात नसून इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. छत्रपतींनी ज्याप्रमाणे बलाढ्य शत्रूशी शक्ती व युक्ती ने लढत रयतेचे राज्य निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना आज केली.शत्रूंच्या बाबतीत युद्धनीतीच्या सर्व आयुधांचा वापर केला परंतु त्यावेळी रयतेच्या गवताच्या काडीची ही काळजी घेतली म्हणून ते महान होते.त्यांचा आदर्श घेत न्यूट्रीस्टार समूह देशातील रोगराई व बेरोजगारी या दोन बलाढ्य शत्रूंचा सामना करण्यासाठी यापुढे व्यसनमुक्त व रोगमुक्त भारताबरोबर बेरोजगारी मुक्त समाज घडवून आर्थिक स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. 


          यावेळी प्रसिद्ध ड्रिमोनर प्रशिक्षण व मार्गदर्शन सेवा चे मुख्यप्रशिक्षक मुस्तकीम साखरकर यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आदर्श व्यवसायाचे सूत्र व नियोजन सांगून प्रभावी मार्गदर्शन केले.यानंतर या महान कार्यात ज्या सहकारी सरदारांनी साथ देत उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना युवा उद्योजक श्री.महेश पाटील,श्री.भास्कर गुरव व न्यूट्रीस्टार समूहाचे आधारस्तंभ श्री.विनायक गुरव यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

         यावेळी समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे,जगप्रसिद्ध गायक व मार्गदर्शक प्रल्हाद पाटील,न्यूट्रीस्टार समूहाचे प्रमुख स्तंभ भारत वरुटे,संदीप कुंभार,देव जाधव यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनाच्या या सोहळ्यास समूहाचे हितचिंतक व सहकारी सहकुटुंब मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart