[राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने श्रावण सोमवार निमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वाटंबर ते सांगोला बसची सोय.]
वाटंबरे /प्रतिनिधी:चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या वाटंबरे गावातून अंगणवाडी पासून उच्च शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी सांगोला शहराकडे जातात . कोळा आटपाडी या भागातून राज्य परिवहनच्या मुक्कामी असणाऱ्या सर्व बसेस पुर्ण क्षमतेने भरुन येत असल्याने या बसेस वाटंबरे येथे थांबा घेत नसल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते तसेच लांब पल्ल्याच्या बसेस वाटंबरे येथे थांबा नसल्याचे कारण देत बसेस थांबवत नाहीत त्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत होते. वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने सांगोला आगार व्यवस्थापक यांच्याशी या संदर्भात चर्चा केली गेली या वेळी त्यांनी श्रावण महिन्याच्या पाहिल्या सोमवार पासून वाटंबरे गावाला विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सोडतो असा शब्द दिला .
सोमवार दि.५ ऑगस्ट रोजी सांगोला आगार यांच्यावतीने सकाळी वाटंबरे येथील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू केली या वेळी चालक व वाहक यांचा वाटंबरे ग्रामस्थ व पवार उद्योग समूहाचे प्रविण पवार व विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .आगार व्यवस्थापक उत्तम अनुशे यांनी तत्परतेने वाटंबरे येथील विद्यार्थ्यांसाठी बसची सोय केल्यामुळे त्यांचेही वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले गेले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा