Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार-आ. शहाजी बापू पाटील*

 *वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करणार-आ. शहाजी बापू पाटील*


नाझरे प्रतिनिधी 

              पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्याचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याचे आश्वासन दिले आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

           महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, पश्चिम महाराष्ट्राचे ज्येष्ठ सल्लागार शिव गोंडा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मा. कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सांगोला तालुका अध्यक्ष रविराज शेटे, सचिव उत्तम काका चौगुले, उपाध्यक्ष अमोल बोत्रे, सौ संगीता चौगुले, दत्तात्रय पवार इ. शिष्ट मंडळ आमदार शहाजी बापू पाटील यांची समक्ष भेट घेऊन स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करा असे सांगून त्यांना निवेदन देण्यात आले, यावेळी मुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी ही आपण बोललो आहे व निश्चितपणे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी सदर शिष्टमंडळास दिले.यावेळी शिष्टमंडळातर्फे आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart