Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १७ जुलै, २०२४

पेन्शनर संघटना सांगोला दिशादर्शक बोर्डाचे उद्घाटन संपन्न.

पेन्शनर संघटना सांगोला दिशादर्शक बोर्डाचे उद्घाटन संपन्न.

सांगोला- सांगोला तालुका पेन्शनर संघटना यांचे कार्यालय असून त्या कार्याकडे निश्चित ठिकाणी जाण्यासाठी सदर दिशादर्शक बोर्डाचे उद्घाटन वासद रोडवरील न्यू इंग्लिश स्कूल जवळ माननीय श्री अजित सिंह मानेसो यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी यांचे पेन्शनर संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री वसंतराव जी दिघे साहेब ज्येष्ठ संचालक श्री शंकरराव सावंत गुरुजी व संचालक श्री विलास नलावडे गुरुजी सेवानिवृत्त सहसचिव श्री खामकर गुरुजी मुख्याध्यापक श्री भारत लवटे गुरुजी उपस्थित होते सदर बोर्ड उद्घाटन प्रसंगी श्री नलवडे गुरुजी यांनी सदर बोर्डाचा उपयोग पेन्शनर संघटना कार्यालय कडे कामकाजासाठी येणाऱ्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांना अतिशय चांगल्या प्रकारे निश्चित फायदा होईल असे विचार व्यक्त केले सदर कार्यक्रमात प्रसंगी श्री शिवाजीराव भंडारे श्री यशवंत तरकसबंद श्री भगवान खटके टेलर श्री सावता माळी कु. पूर्वा चव्हाण व इतर नागरिक उपस्थित होते सदर उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या व शेवटी श्री माने सर यांनी चहापानाने कार्यक्रमाची सांगता केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart