Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, १६ जुलै, २०२४

चोपडी येथील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी कार्यक्रम संपन्न.

चोपडी येथील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी कार्यक्रम संपन्न.

सांगोला /प्रतिनिधी: देशातील आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी या दैवतांच्या आषाढ महिन्यातील यात्रेनिमित्त म्हणजेच वारीनिमित्त चोपडी येथील बाळासाहेब देसाई विद्यालय, व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी व नगर प्रदक्षिणा कार्यक्रम मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी संपन्न झाला. या विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीमध्ये गावातील वारकरी भाविक भक्त व भजनी मंडळ यांचाही विशेष समावेश होता. या वारकरी दिंडीमध्ये बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक के. डी. बाबर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ तसेच विद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी यांचा सहभाग होता. 
विठोबा रखुमाई ,ज्ञानेश्वर माऊली- तुकाराम, या नामघोषात विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेषायातील भूमिका पार पाडत दिंडी व नगर प्रदक्षिणा पूर्ण केली .या नगरप्रदक्षिणेस विद्यालयापासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये स्नेहभोजन देण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart