गुंडादादा खटकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटंबरे येथे वृक्षारोपण.
युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा दादा खटकाळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला होता .या संकल्पनेला साथ देत वाटंबरे येथील मित्र परिवार व शिवसेनेच्या वतीने माणकेश्वर श्री दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.यामध्ये चिंच,,जांभूळ,वड,पिंपळ,आंबा या देशी वृक्ष लावण्यात आले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर दादा पाटील हे होते.वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्चाला फाटा देत वाटंबरे करांनी वृक्ष लागवड करून जो सामाजिक उपक्रम राबविला त्याबद्दल गुंडादादा खटकाळे यांनी वाटंबरे ग्रामस्थांचे आभार मानले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला सरपंच नामदेव पवार,समाज सेवक महादेव पवार , सोसायटी चेअरमन नानाबापु पवार,ग्रा पं सदस्य खंडू पवार, असिफ मुलाणी, विकास पवार, धीरज पवार,संजय पवार,धीरज पवार,राहुल शेठ,दिपक पवार,विनायक पवार, आरमान मुलाणी, व गुंडा दादा खटकाळे मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा