नाझरे प्रतिनिधी
नाझरे ता. सांगोला येथील प्रणव राज शेटे व अमीर तांबोळी यांचे प्राथमिक शिक्षक पदी निवड झाल्याने मैत्री ग्रुप तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन भव्य सत्कार नाझरे येथे करण्यात आला. यावेळी गावाचा नावलौकिक वाढवा व प्रगती करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार रायचुरे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
तर नाझरे या संताच्या भूमीत दोन भूमिपुत्रांनी शिखर गाठले व त्याचा मैत्री ग्रुप तर्फे सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे व संत कवी श्रीधर स्वामी, इमाम साहेब बाबा व गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे यश प्राप्ती झाली असे मत युवा नेते अमर रायचूऱे यांनी व्यक्त केले. यावेळी मंगेश सुतार, अक्षय रायपुरे उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार मंगेश सुतार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा