Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, १७ जून, २०२४

सिंघम वनअधीकारी तुकाराम जाधवर यांची अवैध कोळसा वाहतुकीवर बडगा.

 सिंघम वनअधीकारी तुकाराम जाधवर यांची अवैध कोळसा वाहतुकीवर बडगा.




विनापरवाना कोळसा वाहतुक करणारा आयशर क्र. MH-12 NX 9255 या  टेंपोवर दि.13जुन रोजी पारे डिकसळ रोडवर वनविभागाने कारवाई करत  गाडी जप्त केली. 

मौजे पारे डिकसळ रोडवर गस्त घालत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक घेरडी  व वनमजूर जुनोनी यांनी अवैद्य कोळसा व्यवसाय करणाऱ्या आयशर टेंपोवर कारवाई करत आयशर टेम्पो मालक व ड्रायव्हर अमित तिपन्ना धाबे, व्यापारी शंकरलिंग तिपन्ना धाबे दोघेजण  रा.मुचंडी ता .जत जि.सांगली यांच्या वर कारवाई केली या वेळी त्यांना आयशर टेंपो मध्ये 25000 हजाराची अवैध 85 कोळशाची पोती आढळुन आली .

यांच्यावर कारवाई केली असता त्यांच्याजवळ वन विभागाचा वाहतूक पास नसल्याने आयशर गाडी व 85 कोळशाच्या पोतीसह जप्त करुण  गाडी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे ठेवण्यात आली.


चौकट:

 वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन एका दिवसाला 15 कि. ग्रॉ. ऑक्सीजन लागतो. ज्या झाडाची गोलाई साधारण 6 ते 7 फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला 15 कि.ग्रॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज यांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा. तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्षलागवड करून सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. *यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा, असे आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart