Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २१ जून, २०२४

सरपंच नामदेव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटंबरे येथे वृक्षारोपण.

 सरपंच नामदेव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाटंबरे येथे वृक्षारोपण.



     

 वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार  यांचा ३८ वा वाढदिवस शेतकरी कामगार पक्ष व  त्यांच्या मित्र परिवारातर्फे अनावश्यक खर्चाला फाटा देत  वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. 

यावेळी माण नदीच्या काठावर असलेले माणकेश्वर श्री दत्त मंदिर परिसरात  देशी वृक्षांचे  वृक्षारोपण करण्यात आले.


  यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले.यामध्ये  चिंच,,जांभूळ,वड,पिंपळ हे देशी वृक्ष लावण्यात आले.

या वेळी माजी मुख्याध्यापक नामदेव पवार व प्राध्यापक मिलिंद पवार सर यांनी शेतकरी कामगार पक्ष व सरपंच नामदेव पवार यांच्या मित्रपरिवाराने अनावश्यक खर्चाला फाटा देत पर्यावरण पूरक असा वृक्षारोपणाचा निर्णय घेतला आहे तो खरच  वाखण्या जोगे आहे तरी तरुण पिढीने अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत ते वृक्षारोपणा वेळी ते बोलत होते. 


या वृक्षारोपण कार्यक्रमाला

सरपंच नामदेव पवार, उद्योगपती मोहन पवार, माजी सरपंच नामदेव पवार, मिलिंद पवार सर, गणपत पाटील यशराज गांडूळ खत प्रकल्प उद्योजक सुरेश पवार, पांडुरंग पवार, पोपट पवार, ज्ञानेश्वर जगताप, समाधान पवार,अजहर मुलाणी सर,सर्फराज मुलाणी,बापु मुलाणी,शरद पवार, समाधान पवार, पत्रकार दत्तात्रय पवार, विठ्ठल गेजगे,पिंटु साळुंखे, उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart