नाझरे प्रतिनिधी
श्रीधर दत्तानंद जुनाट मंदिराचे जीर्णोधारक निष्का मी सेवाधीपती बाळ ब्रम्हचारी योगी समर्थ सद्गुरू संजीव स्वामी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त मंदिर नाझरे, वझरे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार 25 जून ते एक जुलै अखेर सकाळी सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ, व रात्र सात ते नऊ कीर्तन आयोजित केले आहे. मंगळवार 25 जून रोजी ह भ प माऊली टेंभू कर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन व नाझरा जागर, बुधवार 26 जून रोजी ह भ प मारुती लवटे महाराज कोल्हापूर यांचे कीर्तन व बलवडी जागर, गुरुवार 27 जून रोजी हभप आदित्य वलेकर महाराज उदनवाडी यांचे कीर्तन तर चिनके जागर, शुक्रवार 28 जून रोजी हभप आप्पा चव्हाण महाराज संजीव आश्रम यांचे कीर्तन तर अहिल्यानगर जागर, शनिवार 29 जून रोजी हभप धोंडीराम यादव महाराज संजीव आश्रम यांचे कीर्तन तर बुध्याळ येथील जागर, रविवार 30 जून रोजी हभप उद्धव महाराज कोळे यांचे कीर्तन व बंडगर वाडी येथील जागर होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा