नाझरे प्रतिनिधी
शासन आपल्या दारी अंतर्गत नाजरा विद्या मंदिर मध्ये निराधार दाखले, विद्यार्थी रहिवाशी दाखले, अल्पभूधारक दाखले व अन्य इतर दाखले देण्याचे काम जागेवर असून या विविध योजनेअंतर्गत दाखले देण्याचे काम तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी नाझरे ता. सांगोला येथे उद्घाटन प्रसंगी केले.
सदर शिबिरात 68 पात्र उमेदवाराचे जागेवर दाखले देण्याचे काम झाले असे मंडल अधिकारी हरीश जाधव यांनी यावेळी सांगितले. सदर प्रसंगी तलाठी किरण वाडी वाले, उमेश सूर्यवंशी, अपर्णा मोरे, योगिता खट्याळ, एस. के. जाधव, रोहित वासवाडे, लिंगराज आलदर इत्यादी तलाठी तसेच अव्वल कारकून कोळी व महा सेतू चे सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार तलाठी अपर्णा मोरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा