कृषी विभागाच्या वतीने राजुरी येथे मोफत बाजरी बियाणे वाटप.
यंदा मान्सून वेळेवर हजर झाल्याने व सांगोला तालुक्यात पेरणी योग्य पावसामुळे सांगोला तालुक्यात कृषी विभाग शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध होण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत आहे .कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या द्वारे शेतकऱ्यांना बाजरी ,मका व सूर्यफुल प्रात्यक्षिक तालुक्यात राबविण्यात येत आहेत.
आज राजुरी येथे तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत यांच्या उपस्थितीत सरपंच प्रतिभा व्हळगळ, उपसरपंच महेश काटे यांच्या हस्ते पन्नास शेतकऱ्यांना बाजरी बियाणे वाटप करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांना बाजरी सुधारीत लागवड पध्दत, बीज प्रक्रिया , बीबीएफ पध्दतीन पेरणी , खत व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .
या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य पिंटु खुळे, काका पुजारी,कल्पेश बंडगर तसेच आप्पासाहेब व्हळगळ, शशिकांत दबडे व प्रमाणावर राजुरी येथील शेतकरी वर्ग बियाणे वाटप करताना उपस्थित होता ..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा