Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १५ जून, २०२४

वाटंबरे केंद्र शाळेत नवागतांचे शैक्षणिक साहित्य देवून स्वागत.

 वाटंबरे केंद्र शाळेत नवागतांचे  शैक्षणिक साहित्य देवून स्वागत.



सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शनिवारी १५ जुन रोजी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 

यावेळी  ग्रामपंचायत वाटंबरे यांनी गावातील शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा सुधारुण गावातील नागरिक हा सुक्षित  असला पाहिजे हे धोरण समोर ठेवून गावातील सर्व शाळांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच डाळिंब व्यवसायासाठी झारखंड या राज्यातून आलेले हबीब फ्रुट सप्लायर्स चे मालक हबिब शेख तसेच  झेप फाउंडेशन सोलापूर जिल्हा सचिव पत्रकार दत्तात्रय पवार यांच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.



  या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले  वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार, ग्रामपंचायत सदस्य  शिवाजी माळी,हबिब फ्रुट सप्लायर्स चे मालक हबिब शेख  झेप फाऊंडेशन चे सोलापूर जिल्हा सचिव पत्रकार दत्तात्रय पवार या सर्व मान्यवरांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 


या कार्यक्रमाला उपस्थित असलेले  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाग्यवान पवार, उपाध्यक्ष चंदनशिवे, सर्व सदस्य  पालक शिवाजी लेंडवे , चंद्रकांत फडतरे , आप्पासाहेब गेजगे, तृष्णा धनवडे , सुरेश माळी,रवी माळी तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माता पालक यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आल. 

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  शिक्षक पांडुरंग कोकरे  यांनी केले तर आभार प्रदर्शन  अरुण मासाळ गुरुजी यांनी केले.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका  मनिषा पवार व राधा तेली  यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart