*कोळेकर मठ संस्थान चे तिसावे मठाधिपती गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी शिवैक्य*
नाझरे प्रतिनिधी
कोळे ता. सांगोला येथील गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी लिंगायत मठ संस्थान कोळेचे तिसावे मठाधिपती श्री श्री श्री रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी यांचे गुरुवार 13 जून रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी कोल्हापूर येथील रुग्णालयात शिवैक्य झाले. याप्रसंगी त्यांचे वय वर्ष 64 होते.
. कोळे ता. सांगोला येथील महास्वामींच्या मठामध्ये गुरुवार 13 जून रोजी सायंकाळी पाच वाजले पासून भक्तगणांसाठी त्यांचे अंत्यदर्शन सुरू राहणार असून, शुक्रवार 14 जून रोजी दुपारी एक वाजले पासून चार वाजेपर्यंत समाधी सोहळा होणार आहे. तरी भक्त गणांनी यांची नोंद घ्यावी असे आवाहन गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी लिंगायत मठ संस्थान कोळे तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा