Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १६ जून, २०२४

पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार संपन्न*

*पेन्शनर संघटनेतर्फे सेवानिवृत्तांचा सत्कार संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
                   पेन्शनर संघटना सांगोला तर्फे सेवानिवृत्तांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी दिगंबर गायकवाड, दगडू वाघमोडे, गोरख सरगर, तात्या काबुगडे, शंकर माने, राजाराम पाटील, तानाजी खबाले, अर्जुन दिघे इत्यादी शिक्षक व इतरांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
              सुरुवातीस पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष वसंतराव दिघे यांनी कोळेकर महास्वामीजी, स्वर्गीय पांडुरंग बुंजकर, स्वर्गीय गजानन राऊत, स्वर्गीय गजानन कुलकर्णी, स्वर्गीय दगडू उंट वाले इत्यादी शिक्षकांबद्दल श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. तसेच सचिव अभिमन्यू कांबळे व सहसचिव दत्तात्रय खामकर यांनी अहवाल वाचन केले. तर संघटनेचे उपाध्यक्ष जयवंत नागणे, सदस्य प्रभाकर कसबे, विलास नलवडे, सौ प्रतिभा शेंडे, सिद्धेश्वर झाडबुके, दिनकर घोडके इत्यादींनी मनोगत व्यक्त केले.
         सदर प्रसंगी सदस्य शंकर सावंत, एकनाथ जावीर, गंगाराम इमडे, अंबिका शिंदे, सुनंदा चव्हाण, बापूसो लवटे, अरुण वाघमोडे, अरुण टेळे, अशोक शेळके, मारुती रुपनर, शिरगिरे, पाटील व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी दिनकर घोडके यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart