Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १६ जून, २०२४

वाटंबरे येथील जि.प.प्रा .शाळा शेरे वस्ती येथे नवागतांचे शैक्षणिक साहित्य देवून स्वागत.

वाटंबरे येथील जि.प.प्रा .शाळा शेरे वस्ती येथे  नवागतांचे  शैक्षणिक साहित्य देवून स्वागत.

सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा शेरे वस्ती येथे शनिवारी १५ जुन रोजी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 
यावेळी वाटंबरे  ग्रामपंचायतीच्या वतीने पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या वतीने शालेय साहित्या बरोबर फुगे, व गुलाब पुष्प देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले . 
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक पवार यांच्या हस्ते  पालक सिताराम पवार, आप्पा  पवार ,शरद पवार, राजेंद्र आलदर या सर्व पालकांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शितोळे गुरुजी अंगणवाडी सेविका राजाक्का पवार, मदतीनिस सुंदराबाई पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart