खा. सुप्रियाताई सुळे व आ. संजय जगताप यांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा .
पुणे /प्रतिनिधी : १६ जुन रविवार रोजी संसद रत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार श्री संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, पुणे येथील तिरंगा चौक येथील अंतर्गत टेकडी साईटला राहणाऱ्या रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आणि चढावर पिण्याचे पाणी चढत नसल्याने महिला भगिनींना मेन रस्त्यापासून हांड्याने, कळशीने पिण्याचे पाणी घेऊन जावे लागत होते त्यांचा त्रास कमी करण्यासाठी व घराजवळ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून आमदार साहेब यांचे स्विय सहाय्यक सुधीर जाधव साहेबानी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याच्या दोन हजार लिटरच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या या कामासाठी झेप फाउंडेशन पुणे,सत्या फाउंडेशन, रयत कामगार संघटना, स्वराज्य प्रतिष्ठान, साईबाबा प्रतिष्ठान, व सर्व सहकारी मित्र परिवारांचे योगदान आहे.
वाघजाई नगर येथील तिरंगा चौकामध्ये बसवण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा रविवार दि.१६/०६/२०२४ रोजी पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेविका स्मिताताई कोंढरे ,कल्पनाताई थोरवे, पुणे शहर सरचिटणीस पप्पू घोलप, आंबेगाव खुर्द ग्रामपंचायत माजी सदस्य गणेश (भाऊ)वनशिव ,आमदार साहेबांचे स्विय सहाय्यक सुधीर जाधव साहेब , पुणे शहर सरचिटणीस गीतांजली जाधव ,डॉ. भालेराव मॅडम ,संतोष काळे, नवनाथ शिंदे , झेप फाउंडेशनचे कांता (भाऊ) राठोड, शिवाजी मुसळे, रमेश राठोड, राजकुमार पवार, सचिन शेठ शेवते, सतीश नाना जगताप, गुळवे काकू , अंजली दरवेश मॅडम वाघजाई नगर परिसरातील नागरिक व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे माता-भगिनी यांनी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व आमदार संजयजी जगताप साहेब यांचे आभार व्यक्त केले आहे व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा