*51 वर्षानंतर माजी विद्यार्थी यांचा मेळावा संपन्न, शेळके गुरुजी व सर्व गुरुजनांचा सत्कार संपन्न*
नाझरे प्रतिनिधी
जि.प. प्रार्थमिक शाळा नाझरे ता. सांगोला येथे 92 वर्षाचे चिरतरुण व्यक्तिमत्व प्रभू खंडू शेळके गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त 1967 ते 1973 या काळातील माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मिसाळ हे होते.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शेळके गुरुजी, मिसाळ गुरुजी, काझी गुरुजी, झाडबुके गुरुजी, विश्वंभर मिसाळ गुरुजी, कुलकर्णी मॅडम, बनसोडे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला. सुरुवातीस माजी विद्यार्थी बंडू काजी यांनी शेर शायरी द्वारे मनोरंजनाचे फवारे उडवले तसेच शेळके गुरुजींचे जावई मोहन जुदळे यांनी आपण कोणतीही गोष्ट आगर महत्त्वाचे काम करताना गुरुचे सहकार्य गरजेचे आहे तसेच शास्त्रास अध्यात्मिक सांगड असणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच सुलभा उर्फ मैना देशपांडे यांनी आपण इतक्या वर्षानंतर भेटतो याचा आनंद झाला असे सांगितले. तसेच 51 वर्ष पूर्वीच्या बालपणाच्या शाळेविषयीच्या आठवणी याचा उजाळा डॉक्टर सोनवणे व इतर माजी विद्यार्थ्यांनी करून दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपसभापती सुनील चौगुले, सरपंच संजय सरगर, उपसरपंच मधुकर आलदर, शिक्षक नेते अशोक पाटील, सुरेश काका चौगुले, त्याचबरोबर माजी विद्यार्थी सुरेश काका देशपांडे, तम्मा पाटील, उत्तम सरगर, आनंदा बनसोडे, मंगल पाटील, मीना घोडके, महादेव वाघमोडे, डॉक्टर वायदंडे, रामन्ना कुल्लोळी, बंडू धोकटे, दिलीप शिरदाडे, सावित्रा जांभळे, नागिन कुंभार, रघुनाथ तेली व सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी भाऊ पाटील, सौ माधुरी जुदळे, सुरेश काका चौगुले तसेच कारंडेवाडी येथील शेळके चौगुले व पाटील परिवारातर्फे शेळके गुरुजी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. गणेश भद्रे, पूजा पाटील, ओंकार देशपांडे यांनी व सर्व माजी विद्यार्थी यांनीही परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाड बुके यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा