झेप फाउंडेशन पुणे ( महाराष्ट्र राज्य )चा 2 रा वर्धापन दिन व कांता (भाऊ) राठोड यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
पुणे /प्रतिनीधी : दि..02/06/2024 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आंबेगाव खुर्द वाघजाई नगर कात्रज पुणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या टीमला आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित (भाऊ )कांबळे, अमरावती जिल्हाध्यक्ष अरुणजी धर्माळे, सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा व पुणे शहर चिटणीस गीतांजलीताई जाधव, पप्पूदादा घोलप ,युवक काँग्रेसचे भूषण दादा रानभरे, आमदार संजय जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुधीर दादा जाधव, सरचिटणीस दीपक कामटे, नवनाथ भाऊ शिंदे ,सुनील मोहिते, बाळाभाऊ कवडे , झेप फाऊंडेशनचे संस्थापक /सचिव शिवाजी मुसळे, रमेश राठोड, विलास अंधारे, शहाजी मुसळे, योगेश भिल्लारे, अनिल बाबर , आशिष किरवे, प्रविण शिंदे,वाघजाई नगर परिसरातील नागरिक व मित्रपरिवार यांनी भेटी दिल्या व रक्तदान केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी झेप फाउंडेशन पुणे तर्फे रक्तदात्यास रक्तदान प्रमाणपत्र , बाईक चालवताना अपघातापासून स्वरक्षण करण्यासाठी व जनहितार्थ संदेश देण्यासाठी हेल्मेट वापरा स्वतःचे रक्षण करा म्हणून हेल्मेट , फळे , इत्यादी वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबिरासाठी सत्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, भैरवी सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ,तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य, युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य , राज्य दैनिक बाळकडू वृत्तपत्र, स्वराज्य प्रतिष्ठान, जनजागृती प्रतिष्ठान, राजे मित्र मंडळ, जय सेवालाल बंजारा ग्रुप, गुरु छाया वृद्धाश्रम, सामाजिक, राजकीय व्यक्ती यांचे सहकार्य लाभले.
झेप फाउंडेशन पुणे (महाराष्ट्र राज्य)च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले व हा कार्यक्रम एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार रक्तदान श्रेष्ठ दान





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा